Chandrakant Patil 
मुंबई

"सैरभैर चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज"

"काय बोलावं कळत नसल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो"

विराज भागवत

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निकाल देत हे आरक्षण नियमबाह्य (Unconstitutional) असल्याचं सांगितलं. त्यामुळे या आरक्षणाबद्दलचा कायदा राज्य सरकारला (State Govt) रद्द करावा लागला. आता पुन्हा मराठा आरक्षण हा विषय चर्चेत आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने मराठा आरक्षणासाठी आपली संपूर्ण ताकद सर्वोच्च न्यायालयात पणाला लावली नाही, त्यामुळेच आरक्षण कोर्टात टिकलं नाही, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले. या आरोपांना उत्तर देताना, चंद्रकांत पाटील यांनी मानसिक उपचारांची गरज असल्याची टीका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. (Mahavikas Aghadi Ashok Chavan Jokingly Trolls BJP Chandrakant Patil)

"सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे", असा टोला त्यांनी लगावला. "प्रचंड ताणतणावामुळे चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे.

मराठा आरक्षण प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी पातळी सोडून टीका केली असे ते म्हणाले. भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केला. त्यामुळे आता त्यांनी काय बोलावं हे कळत नाही. त्यामुळेच ते काहीही बोलतात. त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे, असं चव्हाण म्हणालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT