Narayan-Rane 
मुंबई

"करावं तसं भरावं लागतंच"; नारायण राणेंचा अनिल देशमुखांना टोला

विराज भागवत

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुखांच्या घरावर ईडी छापेमारी

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढत आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या (Nagpur) आणि मुंबईच्या घरांवर आणि इतर मालमत्तांवर ईडीने (Enforcement Directorate) छापेमारी केली. छापेमारीच्या वेळी अनिल देशमुख मुंबईतील (Mumbai) वरळीच्या घरी होते. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाची (Official Residence) म्हणजेच ज्ञानेश्वरी बंगल्याचीही (Dynaneshwari Bungalow) ईडीने झाडाझडती घेतली. ईडीच्या या कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असतानाच भाजप नेते नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Mahavikas Aghadi Ex Minister Anil Deshmukh Houses Properties Raided by ED BJP Narayan Rane Reaction)

अनिल देशमुख यांना अटक करण्याची तयारी ईडीकडून केली जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसत आहे. अशा वेळी भाजप नेते विरूद्ध महाविकास आघाडीचे नेते यांच्यात तू तू मै मै रंगल्याचे चित्र आहे. या कारवाईबद्दल नारायण राणे म्हणाले, "राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ईडीच्या कारवाईमध्ये राजकारण आणू नये. ईडीची कारवाई हा कोणत्याही राजकीय गोष्टींशी संदर्भ असलेला भाग नसतो. ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि त्यांचा तपासदेखील स्वतंत्र स्तरावरच सुरू असतो. सध्या मला अनिल देशमुखांबद्दल असंच म्हणता येईल की करावे तसे भरावे लागेल..."

anil deshmukh

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणतात...

"ईडीकडून देशमुखांवर होत असलेली कारवाई कोणाच्याही आशीवार्दाने किंवा सूडभावनेतून केली जात नाही. ईडी स्वायत्त तपास यंत्रणा आहे. त्यामुळे तपास यंत्रणेचा भाग म्हणून ही कारवाई होत आहे. केंद्र सरकार आणि या कारवाईचा संबंध लावणे चुकीचं आहे. कुठल्याही तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात. त्यामुळे अशाप्रकारचं राजकरण केलं जात असून संबंधित विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची कारवाई आधीच सुरु आहे. या प्रकरणी ईडीने छापेही टाकले होते. तपास यंत्रणेचा भाग म्हणून ईडीकडून पुन्हा छापा टाकण्यात आला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या काळात अशा प्रकारच्या अनेक कारवाया झाल्या आहेत. छापे टाकले गेलेत. सरकारने काही उद्देशाने या कारवाया केल्या होत्या असा संबंध लावणे उचित नाही. कारवाई होत असताना जर काही चुकीचं वाटत असेल तर त्यासाठी न्यायव्यवस्था आहे. मला विश्वास आहे की अशा प्रकारचं चुकीचं काम तपास यंत्रणा करणार ऩाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT