Meeting With Devendra Fadnavis  Sakal
मुंबई

राज्यसभेसाठी मविआची खेळी; बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांना भेटणार

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न या निवडणुकीत होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. दरम्यान आजच महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

छगन भुजबळ,अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील फडणवीस यांची भेट घेणार आहेत. भाजपा किंवा शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक होणारच आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाजपा ठेवणार असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

या बैठकीत सहाव्या जागेचं भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीत आवश्यक तितकी मतं राष्ट्रवादी, शिवसेनेकडे आहेत. पण जर भाजपाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला तर मात्र ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते. दुसरीकडे राज्यसभेच्या ६ आणि विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक लढायचं ठरलं तर महाविकास आघाडीला विधान परिषदेची पाचवी जागा सोडावी लागेल. म्हणजे महाविकास आघाडीला सहा जागा आणि भाजपाला चार जागा, असं समीकरण होईल. पण जर राज्यसभा निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शिवसेनेला सहावी जागा सोडावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT