amit Thackeray 
मुंबई

महेश जाधव यांचे अमित ठाकरेंवर गंभीर आरोप; माथाडी कामगार सेनेची मनसेतून हकालपट्टी

माथाडी कामगार सेनेचे नेते महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- माथाडी कामगार सेनेचे नेते महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, माथाडी कामगार सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ( Mahesh Jadhav Allegation Against amit Thackeray Expulsion of Marathi Kamgar Sena from MNS)

मनसे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते मेडिक्युअर हॉस्पिटल बाहेर थांबले होते. यावेळी मनसेचे कार्यकर्ते देखील तेथे आले. यावेळी माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.

नवी मुंबईतील खारघर येथील महेश जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. त्यानंतर माथाडी कामगार संघटनेची मनसे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासर्व प्रकरणामुळे मनसैनिक एकमेकांच्या समोर आल्याचं पाहायला मिळालं.

महेश जाधव यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की, अमित ठाकरेंनी मला राजगड बंगल्यावर शिविगाळ करुन मारहाण केली. माथाडी कामगारांचा मुद्दा घेऊ नका असं अमित ठाकरे मला म्हणाले. माझ्या जीविताला धोका आहे. त्यामुळे मला काही झालं तर त्यासाठी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांची टीम जबाबदार असेल.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. महेश जाधव यांच्याविरोधात खूप तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना राजगडावर बोलावण्यात आलं होतं. अमित ठाकरेंनी त्यांना मारहाण केलेली नाही. महेश जाधव यांनी अमित ठाकरेंना अत्यंत खालच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली, असं देशपांडे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बस, मेट्रो, लाइट मेट्रोसह १९ उड्डाण पूल; पुणे महानगराचा १ लाख ३३ हजार कोटींचा आराखडा

तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेने ओढणीने घेतला गळफास; कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांनी केला होता आंतरजातीय विवाह, असं काय घडलं?

पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या हिमांशी नरवालची बिग बॉसमध्ये एण्ट्री? मोठी माहिती आली समोर

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची साथ वैभव सूर्यवंशीमुळे सोडतोय? १४ वर्षीय फलंदाजाबद्दल कॅप्टन काय म्हणाला वाचा...

Prajakta Mali Net Worth : स्वत:चं कोटींचं फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड अन् बरंच काही...प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT