किशोरी पेडणेकर  File photo
मुंबई

ते काय 'दूध के धुले' आहेत का? - महापौर किशोरी पेडणेकर

डोळसपणे कारभार करण्याचा अधिकाऱ्यांना सल्ला

विराज भागवत
  • मालाड इमारत दुर्घटनेबाबत महापौरांनी व्यक्त केली खंत; अधिक डोळस कारभार करण्याचा अधिकाऱ्यांना सल्ला

"मालाड दुर्घटनेची जबाबदारी कुणाची हे सांगताना दु:ख होतं. महानगर पालिका, बीपीटी आणि इतर विभागांची बैठक घेतली होती. प्रशासनाने जबाबदारीने आपली कामे नीट केली असती तर ही वेळ आली नसती. ज्यांचा जीव गेला त्यात ५ वर्षांच्या लहान मुलाचाही समावेश आहे. त्या निष्पाप लोकांची काहीच चूक नव्हती पण त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सी-कॅटेगरीमधील म्हणजेच धोकादायक इमारतीची घोषणा झाल्यानंतर नागरिकांना तातडीने हलवायला हवं. या पुढे अशा घटनांना डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. भाजपचे लोक आरोप करत असतात. पण ते काय 'दुध के धुले' आहेत का? ही राजकारणाची वेळ नाही", अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालाड दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. मालाड दुर्घटनेत एकूण ११ मृत्यू आणि ७ जखमी झाली. (Malad Building Collapse Mumbai Mayor Kishori Pednekar Reaction Slams BJP Leaders)

"या दुर्घटनेमुळे आमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे. प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष घातलं तर अशा घटना घडणार नाहीत. अनधिकृत बांधकामांबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. गृहनिर्माण मंञी जितेंद्र आव्हाडही बैठकांना होते. कोर्टाचे आदेश असल्याने कारवाई थांबली आहे. मात्र आता ठोस कारवाई केली जाईल. या घटनांनंतर पालिकेच्या वार्ड ऑफिसरला प्रत्येक वार्डातील डीओला अनाधिकृत बांधकामावर कारवाई करायला सांगण्यात येईल", असं महापौर म्हणाल्या.

"अनाधिकृत बांधकामांच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप करायला नको. कालचा पाऊस खूपच होता. हा पाऊस १५० मिमीच्या वर होता. या पावसात सात ते आठ तास कर्मचारी काम करत होते. मात्र पाणी बाहेर फेकलं जात नव्हतं. जे पाणी पाच पाच दिवस तुंबायचे आणि वाहतुकीचा खोळंबा व्हायचा तेथे काल काही तासात पाणी उपसा झाला. नेहमी जिथे कंबरेभर तुंबते, त्याठिकाणी गुडघाभर पाणी होते. हिंदमाता येथे न्यायालयातील लढाईत २८ दिवस वाया गेले. मात्र ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची उंची वाढलेली आहे. त्यामुळे इमारती परिसरात सखल भाग झाला आहे. पण संपूर्ण मुंबईत ४७५ पंप लावण्यात आलेले आहेत", अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : विक्रम मोडणार! २६ लाख दिव्यांसह इतिहास रचणाऱ्या दीपोत्सवाची भव्य तयारी सुरू

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

Jalgaon News : जळगावकरांची दिवाळी खड्ड्यांतच! महामार्गावरील बिकट अवस्थेमुळे अपघात व धुळीचा त्रास

Pune River Pollution : पुण्यातील लकडी पुलाखाली राडारोडा टाकण्याची घटना, महापालिकेचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT