Malad D-Mart
Malad D-Mart sakal media
मुंबई

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडचे 'D-MART' सिल, महापालिकेचा दणका

- समीर सुर्वे

मुंबई : कोविड प्रतिबंधक नियमावलीचे (corona rules) पालन होत नसल्याबद्दल आज महानगरपालिकेने (BMC) मालाड येथील डी मार्ट (Malad D Mart) सिल केले आहे. संबंधीत व्यवस्थापनाला नोटीस देऊन (Notice) तीन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. साथ नियंत्रण कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या स्टोअरचे परवान रद्द( License) होण्याची शक्‍यता आहे. (Malad D Mart sealed by BMC because of breaking corona rules-nss91)

कोविड नियमांचे पालन करताना स्टोअर मध्ये जास्तीत जास्त 150 व्यक्ती उपस्थीत राहाणे बंधनकारक होते.मात्र,पालिकेच्या पाहाणीत तब्बल 600 च्या आसपास व्यक्ती स्टोअर मध्ये उपस्थीत होत्या. मुंबईत आजही कोविड प्रतिबंधक नियमावली नुसार लॉकडाऊन लागू आहे.त्यात,अत्यावश्‍यक सेवेचे व्यवसाय शनिवारी रविवारीही करण्याची परवानगी आहे.मात्र,नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.

मालाड पश्‍चिमेकडील लिंक रोडवरील या स्टोअर मध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे पालिकेच्या तपासणीत आढळले.कर्मचाऱ्यांनी विशेषत: बिल कांऊटर वरील कर्मचाऱ्यांनी मास्क व हातमोजे वापरले नव्हते.तसेच,कर्मचारी,ग्राहक वावरत असताना सुरक्षीत अंतर पाळले जात नसल्याचे आढळले असून एकाच वेळी गर्दी झाल्याचे दिसत होते.यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेच्या पी उत्तर विभागा कार्यालया मार्फत सांगण्यात आले. कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने पुढील आदेशा पर्यंत हे स्टोअर सिल केले आहे.तसेच,नियमभंग प्रकरणी परवान कायमस्वरुपी का रद्द केले जाऊ नये याबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी नोटीस पाठवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT