मुंबई

मुंबई: मुख्याध्यापक असावे तर असे, शाळा चालवण्यासाठी संपवली बचत

दीनानाथ परब

मुंबई: मालाडमधील झोपडपट्टी भागातील तब्बल 960 विद्यार्थी मालवणीच्या होली मदर इंग्रजी शाळेत (Holy Mother English School) शिक्षण घेत आहेत. गेल्या दिड वर्षापासून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना माहामारीने सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मात्र, मालाडच्या होली मदर शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक मोहम्मद रफिक सिद्दीकी (Mohammad Rafique Siddiqui) यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या (slums) आणि आपल्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना माहामारीत मदतीची हात दिला आहे. शाळा सुरु ठेवण्यासाठी रफिक यांनी स्वत:च्या बचत खात्यातील सर्व पैसे वापरले. आता त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्याचे वेतन (staff payment) देता यावे, यासाठी शाळेतील अभ्यासिका, प्रयोगशाळेचे रुम भाडेतत्वार दिले आहेत. त्यासाठी त्यांनी समोरच्या माणसाकडून पाच लाख रुपये डिपॉझिट घेतले. कोरोना साथीच्या महामारीत शाळा सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. (Malad Holy Mother English Schools principal rents out lab library to stay school afloat)

शाळेचे मुख्याध्यापक आणि मालक रफिक सिद्दीकी यांनी 2004 मध्ये स्वत:चे राहते घर विकून होली मदर इंग्रजी शाळा सुरु केली. शाळेतील आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी भाडेतत्वावर दिलेल्या अभ्यासिका आणि प्रयोगशाळेच्या माध्यमातून रफिक यांना 5 लक्ष रुपयांची अनामत रक्कम मिळाली. मागील महिन्यात त्यांनी या अनामत रकमेच्या आधाराने शालेय कर्मचाऱ्यांचे वेतन दिले. विशेष म्हणजे 52 वर्षांचे सिद्दीकी हे दिव्यांग आहेत. त्यांनी कोरोना काळात शाळा उत्तमपणे सुरु ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

सिद्दीकी म्हणाले की, शाळेतील तब्बल 18 चालकांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात 125 टन अन्नधान्याचे वाटप केले. त्यामुळे तब्बल 12000 कुटुंबांतील विद्यार्थ्यांना तसेच गरजूंना या सेवेचा लाभ मिळाला. दरम्यान, शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना रोगप्रतिकारक मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. महत्वाचं म्हणजे,शाळेतील तब्बल 660 विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वर्षभराचे शुल्क माफ करण्यात आले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेत असताना अडी-अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांची शालेय फी माफ करण्यात आल्याचे प्राध्यापक सिद्दीकी यांनी सांगितले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

तसंच ते पुढे म्हणाले की, 2004 ला शाळा सुरु करण्यासाठी राहत्या घराची विक्री करावी लागली. तेव्हापासून मी भाड्याच्या घरात राहत आहे.शाळेचे व्यवस्थापन सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी मला माझ्या पत्नीचे दागिने 3.5 लाख रुपयांना गहाण ठेवावे लागले. शालेय मालमत्ता भाडेतत्वावर दिल्याने शाळेतील आर्थिक व्यवहाराची घडी सद्यस्थितीला बिघडली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कोरोना संकट येण्यापूर्वी शाळेला वर्षाला 40-50 लाख रुपयांची कमाई व्हायची. मात्र करोनाचा प्रसार झाल्यानंतर अनेक समस्यांनी तोंड उघडले. पालक वर्गाला नोकरी नसल्याने विद्यार्थ्यांची फी भरण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची फी माफ करावी लागली. मागील वर्षी शाळेला आर्थिक कमाई झाली नाही. ऑनलाईन शाळा सुरु ठेवण्यासाठी तब्बल 9.5 लाख रुपये खर्च करावा लागला. शालेय तसंच इतर खर्च असल्याने शाळेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शाळेचा खर्च तब्बल 19 लाखांवर पोहोचला आहे अशी शाळा चालवताना येणारी आर्थिक चणचणही सिद्दीकी यांनी सांगितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT