Skin decease sakal media
मुंबई

मुंबई : मालवणीत महिलांच्या पायाला त्वचारोग

रस्त्यावरील घाण पाण्यामुळे आजार झाल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मालाड : मालवणीतील (Malwani) प्रवेशद्वार क्रमांक आठ येथील एकतानगर येथे अनेक महिलांना त्वचारोग (women's skin decease) झाला असून रस्त्यावरील घाण पाण्यामुळे (sewage) हा आजार होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. एकतानगर अपना घर सोसायटी (Ekta nagar society) येथील काही महिलांच्या पायाला त्वचारोग झाले आहेत. हे रोग त्यांना घरालगत असलेल्या रस्त्यावर पावसाचे घाण पाणी साचून असल्याने त्यात ये-जा केल्याने झाल्याचे त्या म्हणत आहेत.

या परिसरात पावसाच्या पाण्याचा नीट निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने या रस्त्यावर पावसाचे पाणी नेहमी साचत असते. नागरिकांना येथूनच ये-जा करावी लागते. या रोगामुळे प्रचंड खाज येते. तसेच पाय कुजल्यासारखे झाले आहेत. महिलांवर स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत.

दवाखान्यात पाठवा

सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अमोल जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगत त्यांना मालवणीतील पालिका दवाखान्यात पाठवा, आम्ही त्यांच्यावर तिथे उपचार करू असे सांगितले.


"एकतानगर येथील गटारांचे काम सुरू केले आहे. येत्या पावसात हा प्रश्न नसेल."
- वीरेंद्र चौधरी, नगरसेवक प्रभाग क्रमांक ३३ आणि पालिका आरोग्य समिती सदस्य

"आम्ही खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहोत. गेल्या सहा महिन्यांपासून हा त्रास होत आहे. आम्ही पालिकेत उपचार घेऊ; मात्र घाण पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही."
- इंद्रावती सोनी, रहिवासी महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT