sadhvi pradnya sigh thakur highcout sakal
मुंबई

Malegaon Bomb Blast Case: प्रज्ञासिंग ठाकूर यांना २० एप्रिलपासून सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले होते.(mumbai highcourt)

त्यानुसार आज (ता.८) एनआयएने प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा वैद्यकीय अहवाल सादर करत प्रज्ञासिंग यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना तूर्त आरामाची गरज असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेताना प्रज्ञासिंग यांना २० एप्रिलपासून सुनावणीला हजर राहावे असे निर्देश न्यायालयाने दिले.(maharashtra news)

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या बाॅम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपी असून त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे.

साध्वी प्रज्ञासिंग वारंवार प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत गैरहजर राहतात. त्यांच्यामुळे बॉम्बस्फोट खटला रखडतोय, असे ताशेरे ओढत न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रकृतीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश एनआयएला दिले होते.(marathi news)

त्यानुसार तपास यंत्रणेने सोमवारी विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यापुढे अहवाल सादर केला. प्रज्ञासिंग यांची तब्येत ठीक नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तूर्त आरामाची गरज असल्याचे एनआयएने कळवले. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रज्ञासिंग यांना हजेरीपासून सूट दिली. मात्र २० एप्रिल व त्यापुढील तारखांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ३१३ अन्वये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावेच लागेल, असे प्रज्ञासिंग यांना बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT