Maleshj accident car esakal
मुंबई

Malshej Ghat Accident: माळशेज घाटात कारचा भीषण अपघात!  क्रेनचा वापर करून तीन जणांना वाचवले, तिघांचा मृत्यू

Ertiga Car accident in Malshej Ghat: माळशेज घाट रस्त्यावर वेगाने वाहने चालविली जातात. त्या रस्त्यावर वळणे असल्याने चालकाचा अंदाज चुकल्यास अपघात होत असतात.

सकाळ वृत्तसेवा

Murbad Latest Update: माळशेज घाटाकडे जाणाऱ्या एका कारचा रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबाड तालुक्यातील भोरांडे गावा जवळील वळणावर हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की त्या कार मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.

नरेश मधुकर म्हात्रे राहणार चिंचपाडा वय 26 , प्रतीक चोरगे राहणार गोवेली वय 21 , अश्विन भोईर राहणार वरप वय 26 असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना कल्याण येथे हलविण्यात आले आहे.

वैभव अशोक कुमावत राहणार चिंचपाडा , बंटी उर्फ शिवाजी पुंडलिक गाडगे राहणार रेवती पाडा , अक्षय घाडगे राहणार रेवतीपाडा गोवेली असे गंभीर व्यक्तींची नावे आहेत.

हे सर्वजण ईरटीका कार क्रमांक MH 05--EA 1993 मधून कल्याण वरून माळशेज घाट मार्गे जात असताना अपघात झाला. माळशेज घाट रस्त्यावर वेगाने वाहने चालविली जातात. त्या रस्त्यावर वळणे असल्याने चालकाचा अंदाज चुकल्यास अपघात होत असतात. त्यासाठी या रस्त्यावरून संयमित वेगाने वाहने चालवावे असे आवाहन टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT