अल्पवयीन मुलीवर बलात्कार Sakal
मुंबई

अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं!

१३ वर्षांच्या दोन मुलींना जंगलात नेऊन तो त्यांच्यावर बलात्कार करायचा.

सकाळ डिजिटल टीम

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने एकाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या एका वर्षापासून आरोपी १३ वर्षीय दोन्ही मुलींना वसई भागातल्या एका जंगलात घेऊन जायचा आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार करायचा, अशी माहिती मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे.

या माणसाने या मुलींकडे ७० हजार रुपयेही मागितले होते. जर पैसे दिले नाहीत, तर तुमचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकेन अशी धमकीही त्याने या मुलींना दिली. या मुलीच्या पालकांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

या तक्रारीनुसार या आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३७७(अनैसर्गिक संभोग), ३८४(खंडणी) आणि ५०६ (धमकी) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Malshiras Pickup Accident : देवदर्शन ठरले अखेरचे! सोलापूरमध्ये भीषण अपघात; पिकअप गाडी विहिरीत पडल्याने १४ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; ऑनलाइन फसवणुकीचे सत्र सुरूच, वेगवेगळ्या घटनांत तिघांना १५ लाखांचा गंडा

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

SCROLL FOR NEXT