court sakal
मुंबई

मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला वर्षभराचीच शिक्षा; 'हे' ठरलं कारण

Crime News : 50 वर्षीय बापानं 20 वर्षीय मुलीवर केला होता अत्याचार

सुधीर काकडे

मुंबई: न्यायालयाने दिलेल्या एका निकालाची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. आपल्या वृद्ध आईची काळजी घेणं आवश्यक असल्यानं, न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आपल्याच 20 वर्षांच्या मुलीवर घरात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या 50 वर्षीय वडिलांना फक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पीडितेने गेल्या वर्षी न्यायालयात धाव घेतली होती.

"बापाने आपल्या मुलीवर केलेले अत्याचार गंभीर असल्यानं, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र लैंगिक छळाचा हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला तरी, आरोपीचे वय विचारात घेतले जाऊ शकते. तसंच आरोपीचा हा पहिला गुन्हा आहे. महत्वाचं म्हणजे त्याला त्याच्या वृद्ध आईची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शिक्षा सुनावताना या सर्व गोष्टींची योग्य विचार केल्यास न्याय होईल" असं दंडाधिकारी एसए बजाज म्हणाले.

या खटल्यात जास्तीत जास्त तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आरोपीला सुनावली गेली, मात्र 19 जून 2021 रोजी अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगात आहे. त्यामुळे न्यायालयाने सांगितले की, त्याने आधीच तुरुंगात घालवलेला वेळ शिक्षेमधून वजा केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT