मुंबई

दोन महिलांच्या अंगावरील मंगळसूत्रे चोरून पलायन 

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - सोनसाखळी चोरांनी जुईनगर आणि पनवेलमध्ये दोन महिलांच्या अंगावरील सुमारे 85 हजार रुपये किमतीची मंगळसूत्रे चोरून पलायन केले. जुईनगर रेल्वेस्टेशनवरून 18 एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सेक्‍टर 5 मध्ये शर्मिला गुप्ता पायी जात होत्या. या वेळी अंधाराचा फायदा घेत एका चोरट्याने गुप्ता यांच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. गुप्ता यांनी दुसऱ्या दिवशी सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

22 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अशीच आणखी एक घटना घडली. यात पनवेलच्या तक्का भागात राहणाऱ्या कल्पना पटेल यांच्या अंगावरील 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लुटले. कल्पना पटेल या बहीण आणि वहिनी यांच्यासोबत कल्पतरू गार्डन ते चाणक्‍य हॉटेल रोडने पायी जात असताना समोरून मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने कल्पना पटेल यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. त्यानंतर कल्पना पटेल यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT