Mansukh-Hiren-Call 
मुंबई

Mansukh Hiren Case: मनसुख हिरेनला फोन करून घोडबंदरला बोलवणारा 'तावडे' सापडला?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने रविवारी सकाळी दोन आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन यांच्या हत्या प्रकरणात सचिन वाझे हे मुख्य आरोपी असून हिरेन यांच्या हत्येच्या कटात आज नव्याने अटक केलेल्या दोन आरोपींचाही समावेश होता, असा दावा एटीएसने केला. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाजारी करणारा बुकी नरेश धरे याला रविवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली. या दोघांची चौकशी केल्यानंतर मनसुख हिरेनला फोन करून घोडबंदरला बोलावणारा तावडे नावाचा पोलीस अधिकारी कोण याचा उलगडा झाल्याचे बोलले जात आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या दिवशी सापडला त्याच्या आदल्या दिवशी हिरेनला तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याचा शोध एटीएसला लागल्याचे सांगितलं जात आहे. मनसुख यांना फोन करून भेटायला बोलवणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून विनायक शिंदे हाच होता असं तपासात समोर आल्याचं बोललं जात आहे. एटीएसने या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता या चर्चांना उधाण आले आहे. विनायक शिंदेने ४ फेब्रुवारीला मनसुख हिरेनला फोनवरून कांदिवली क्राइम ब्रँचमधून तावडे या नावाने फोन करून घोडबंदर येथं बोलावलं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला, असा निष्कर्ष एटीएसने तपासाअंती काढला असल्याची माहिती आहे.

तसेच, दुसरा आरोपी नरेश धरे हा बुकी असून त्याने या हत्या प्रकरणात आरोपींना ओळख लपवण्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आलं असल्याचीही माहिती आहे. धरेने गुजरातचे सीम कार्ड या गुन्ह्यात वापरण्यासाठी आरोपींना मदत केल्याचं तपासात समोर आलं आहे. याच सिमकार्डवरून विनायकने मनसुखला फोन केले होते. या गुन्ह्यात इतर आरोपींचाही सहभाग असून लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे, अशीही माहिती आहे. त्याचसोबत, या प्रकरणात अटकेची कारवाई झाली असली तरीही हिरेन यांची हत्या का करण्यात आली? याचा शोध एटीएस घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer News : लातूरमध्ये संतापजनक प्रकार! बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवलं अन्...

Vidarbha Heatwave Update : विदर्भात उष्णतेचा कहर! पारा थेट ४६.६ अंशांवर; 'या' दोन जिल्ह्यांत विक्रमी तापमान, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

Shiv Sena Leader Attack : परळीत हॉटेलमध्ये घुसून शिवसेना नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार; सोडवायला आलेल्या पत्नीलाही मारहाण, हाताची तुटली बोटं

Virat Kohli Scripts History! विराट कोहलीचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! IPL मध्ये असे पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज...

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT