मुंबई

Atal Setu: अटल सेतू ठरतोय सुसाईड पॉँईट? थक्क करणारी आकडेवारी आली समोर!

Latest Mumbai News | तणावग्रस्त लोक त्यांच्या वाहनाने पुलावर जातात, नंतर ते त्यांची वाहने पुलावर उभी करतात.

विक्रम गायकवाड

latest navi Mumbai News: नवी मुंबईला जोडण्यासोबतच मुंबईतून पुणे, गोव्याला लवकर पोहोचण्यासाठी अटल सेतू उपयुक्त ठरला आहे; परंतु या अटल सेतूचे उद्‍घाटन झाल्यापासून गत नऊ महिन्यांमध्ये या पुलावर सहा आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एका महिलेला कॅबचालकाने वाचवले आहे; तर इतर पाच जणांचा पुलावरून समुद्रात उडी मारल्यामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी (ता. २) सकाळी माटुंग्यातील फिलिप शाह (५२) यांची सहावी आत्महत्येची घटना आहे. दिवसेंदिवस या पुलावरील आत्महत्येच्या घटनांत वाढ होऊ लागल्याने हा पूलदेखील आता सुसाइड पॉइंट ठरू लागला आहे.

सर्वांत प्रथम मार्च महिन्यामध्ये दादर भोईवाडा परिसरात राहणाऱ्या किंजल शहा (४३) या महिला डॉक्टरने नैराश्येतून अटल सेतूवरून उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) सुशांत चक्रवर्ती (४०) या बँकरने तणावामुळे अटल सेतूवरून समुद्रात उडी मारली होती. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला होता.

त्यानंतर लगेच दोन दिवसांनी बुधवारी (ता. २) माटुंगा येथील व्यावसायिक फिलीप शाह यांनी आत्महत्या केली. जुलै महिन्यामध्ये एका ३८ वर्षीय अभियंत्यानेदेखील अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्या अभियंत्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

त्याचप्रमाणे पलावा सीटीतील रहिवासी करुतुरी श्रीनिवास यांनीही कामाच्या तणावातून अटल सेतूवरून उडी मारून आपले जीवन संपवले. त्याचाही मृतदेह अद्याप सापडलेला नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये अटल सेतूवरून उडी टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या व ब्रिजच्या रेलिंगला लटकलेल्या ५६ वर्षीय महिलेला कॅबचालकाने व न्हावा-शेवा वाहतूक पोलिसांनी वाचविले होते.
----------

कठड्याची उंची वाढविण्याची मागणी


शिवडी- न्हावा- शेवा अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक)वरील आत्महत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. २१ किलोमीटर लांबीचा हा पूल समुद्रापासून खूप उंचीवर बांधण्यात आला आहे. तणावग्रस्त लोक त्यांच्या वाहनाने पुलावर जातात, नंतर ते त्यांची वाहने पुलावर उभी करतात.

त्यानंतर पुलाच्या कठड्यावरून ते समुद्रात उडी मारून आत्महत्या करत असल्याचे आढळून आले आहे. या पुलावरील कठड्याची उंची खूपच कमी आहे. त्यामुळे त्याच्यावर चढणे सोपे असल्यामुळे पुलावरील कठड्याची उंची वाढवण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार या पुलावर वेविंग बॅरिकेड्स लावण्याच्या हालचाली एमएमआरडीएकडून सुरू आहेत.

महिलेला वाचविण्यात यश


ऑगस्ट महिन्यामध्ये अटल सेतूवरून उडी टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या व ब्रिजच्या रेलिंगला लटकलेल्या ५६ वर्षीय महिलेला कॅबचालकाने व न्हावा-शेवा वाहतूक पोलिसांनी वाचविल्याची घटना घडली होती. त्यामुळे आतापर्यंत आत्महत्यांच्या झालेल्या घटनांमध्ये फक्त एका व्यक्तीला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Accident : जळगावजवळ भीषण अपघात: दुभाजकावर धडकलेल्या कारने घेतला पेट; गर्भवती महिलेचा करुण अंत

Latest Marathi Breaking News : मालेगाव पोलिस सज्ज; दिल्ली बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट

Today Horoscope: भौम-पुष्य योगाचा संयोग! कर्क, कन्या आणि इतर राशींवर बजरंगबलींची विशेष कृपा; वाचा आजचं राशीभविष्य

Bullock Cart Race: 'बोरगावात श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत एक ठार'; बारा जण जखमी, कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा

Viral Video: पठ्ठ्याने रिलसाठी चक्क धावत्या ट्रेनच्या दरवाजात केली आंघोळ, पण नंतर बसला मोठा झटका; पाहा नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT