मेट्रोच्या अनेक फेऱ्या रिकाम्याच; पहिल्या दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी  
मुंबई

मेट्रोच्या अनेक फेऱ्या रिकाम्याच; पहिल्या दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी

जीवन तांबे

चेंबूर : लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली मुंबईची मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेकरीता सुरू झाली. मात्र सप्ताहाचा पहिला दिवस असूनही स्थानकांवर तुरळक गर्दी दिसून येत होती. आज सकाळी घाटकोपर मेट्रो स्थानकातून 8.30 वाजताच्या सुमारास घाटकोपरहून वर्सोवाला पहिली गाडी सोडण्यात आली. त्यात केवळ 12 प्रवासी होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने मेट्रो रिकाम्याच धावत असल्याचे चित्र होते.

सोमवारी दिवसभरात रात्रीपर्यत मेट्रोच्या एकूण 300 फेऱ्या नियोजित होत्या. सध्या मेट्रोत केवळ 300 प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार आहे. दुपारपर्यंत घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकातून एकूण 100 प्रवाशांनी प्रवास केला. प्लास्टिक टोकन ऐवजी क्‍युआर पेपर तिकीट, स्मार्ट कार्ड, डिजीटल तिकीट यांचा वापर करण्यात येत होता. तसेच प्रवाशांना मास्क घालणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवेशद्वारावरच प्रवाशांकरीता सतत सूचना आणि प्रोटोकॉलची माहिती देण्यात येत होती. कोव्हिडची लक्षणे दिसून आल्यास काही प्रवाशांना प्रवेश नाकारण्यात येत होता. स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करून, सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येक प्रवाशांची थर्मल चाचणी करण्यात येत होती. प्रवाशांना सॅनिटाझरची सोय उपलब्ध करण्यात आली होती. 

बंद प्रवेशद्वारामुळे कमी प्रवासी 
मध्य रेल्वेने बंद केलेला मुख्य दरवाजा हा मेट्रोला पहिल्या दिवशी कमी प्रवासी मिळण्यास कारणीभूत ठरला. मध्य रेल्वेने सर्व सामान्यांकरिता रेल्वे सुरू केलेली नाही. तसेच रेल्वेने मेट्रो व मध्य रेल्वेला लागून असलेला मुख्य दरवाजा बंद केला असल्याने प्रवाशांना मेट्रो सुरू झाली आहे की नाही? याची कल्पना नाही. त्यामुळे आज पहिल्या दिवशी मेट्रोचे प्रवास करणारे प्रवाशी तुरळक दिसत होते. 

हळूहळू प्रतिसाद वाढीची प्रशासनाला आशा 
मेट्रो प्रशासनाकडून प्रवासाकरिता कोणते प्रवेशद्वार खुले केले आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षकही ते काम बजावत आहे. मेट्रो कर्मचारी ही प्रवाशांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम करत आहे. पहिला दिवस असल्याने प्रवासी कमी दिसत आहेत. उद्यापासून प्रवाशांमध्ये वाढ होईल. असे एका मेट्रो अधिकाऱ्याने न छापण्याच्या अटीवर सांगितले. 
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT