मराठा महासंघात नेतृत्वाचा संघर्ष sakal news
मुंबई

मराठा महासंघात नेतृत्वाचा संघर्ष

शशिकांत पवार विरूद्ध राजेंद्र कोंढरे वाद शिगेला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात गरीब, मजूर मराठा समाजाच्या आर्थिक आणि न्याय हक्काचा लढा उभा करणाऱ्या मराठा महासंघातच आता नेतृत्वाचा संघर्ष निर्माण झाला आहे. महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी स्वतःची मराठा महासंघाच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केल्यानंतर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार यांनी तातडीने कार्यकारिणीची बैठक बोलावून कोंढरे यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी केली आहे. यामुळे मराठा महासंघातील उभी फूट समोर आली.

मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दादरच्या शिवाजी मराठा संस्थेत बैठक बोलावली होती. यामधे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांची पदावरून हकालपट्टी करतानाच त्यांनी नेमणूक केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द केल्या आहेत. दरम्यान, सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी ( ता. ३) पुणे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अध्यक्षपदाचा ठराव मांडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याचे जाहीर केले. यावरूनच मराठा महासंघात शशिकांत पवार विरूध्द राजेंद्र कोंढरे असा नवा वाद सुरू झाला.

कोंढरेना अधिकार नाही : पवार

संघठनेच्या अधिकृत घटनेनुसार कोंढरे यांना अशा प्रकारचा निर्णय अथवा बैठक घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा मराठा महासंघाच्या वतीने केला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आज अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मुंबईत कार्यकारिणी बैठक बोलावली होती. संस्थेच्या घटनेनुसार २०२० मधे अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली. घटनेच्या नियमानुसार नवा अध्यक्ष निवडताना निवडणूक होते. पण राजेंद्र कोंढरे यांनी हा नियम न पाळता स्वतःला अध्यक्ष म्हणून निवडल्याचा आरोप आजच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. त्यामुळे राजेंद्र कोंढरे यांची मराठा महासंघातून हकालपट्टी करण्याचा ठराव संमत केल्याची माहिती शशिकांत पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT