मुंबई

दुःखद ! मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मराठी शुद्धलेखन घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे (64) कर्करोगाने गुरुवारी (ता. 14) सकाळी 10 वाजता नाशिक येथे निधन झाले. चार वर्षांपासून त्यांचे नाशिकमध्ये वास्तव्य होते. शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे, हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

वडिलोपार्जित मुद्रण व्यवसायात असलेले फडके सुरुवातीला गरज म्हणून मुद्रितशोधन करू लागले. भाषेची आवड त्यांना पूर्वीपासून होती. त्यातूनच त्यांनी पुढे मराठी शुद्धलेखन या विषयाला वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेपासून समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके अरुण फडके यांनी लिहिली होती. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले अॅपही खूप उपयुक्त ठरत आहे. शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. काही वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य सुरूच होते. 

भाषा विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन नियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल; तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल, असे फडके यांचे मत होते. लेखनाचे नियम आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास भाषा संकटात येऊ शकते, असेही ते सांगत असत. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगाने प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 'शुद्धलेखन ठेवा खिशात', 'शुद्धलेखन मार्गप्रदीप', 'सोपे मराठी शुद्धलेखन', 'मला मराठी शिकायचंय' आदी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT