Marathi boy in mumbai  Sakal
मुंबई

Video : मुंबईत शेतमाल विक्रीस गेलेल्या मराठी तरूणाला स्थानिकांकडून त्रास; थेट राजू शेट्टींची वादात उडी

काही अडचण आल्यास थेट मला फोन करा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई हे मराठी माणसांचं शहर असल्याचं बोललं जातं. पण अनेकदा या शहरात मराठी माणसांवरच अन्याय होताना पाहायला मिळतो. परप्रांतीयांकडून किंवा इतर लोकांकडून मराठी माणसांना त्रास दिल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर बेदाणे विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला स्थानिक प्रशासनाकडून त्रास देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी या वादात उडी घेतली.

अधिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील प्रशांत पाटील हा तरूण सीएसएमटी येथे बेदाणे विक्री करत होता. यावेळी त्याला स्थानिक प्रशासनाकडून विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्रास देण्यात आला. "इतर लोक बिनधास्त विकत आहेत त्यांना मात्र कोण काही करत नाही पण या मराठी तरुणाला त्रास दिला जातो, मुंबईत मराठी माणसालाच धंदा करू देत नाहीत." असा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

सदर तरूणानेही या व्हिडिओमध्ये आपली आपबिती सांगितली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला. त्यानंतर या वादामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतली असून स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे.

"संबंधित बेदाणे विकणाऱ्या तरूण शेतकऱ्यास शेतीमाल विक्रीसाठी पुन्हा काही अडचण आल्यास मला थेट 9822542327 , 9922424327 या माझ्या नंबरवरती संपर्क करण्यास सांगा. संबधित अधिकारी स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये अन्यथा तुम्हाला कात्रजचा घाट दाखवावा लागेल." असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT