मुंबई

आजीबाईंची शाळा थेट लिम्का बुकमध्ये

सकाळवृत्तसेवा

मुरबाड - ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मुरबाड तालुक्‍यातील फांगणे गावातील आजीबाईंची शाळा थेट लिम्का बुकमध्ये पोहचली आहे. या शाळेची नोंद लिम्का बुकमध्ये झाल्याने मुरबाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुरबाड तालुक्‍यातील दुर्गम भागातील फांगणे गावात जिल्हा परिषद शिक्षक योगेंद्र बांगर यांनी कै. मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक दिलीप दलाल यांच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी आजीबाईंची शाळा सुरू केली.

या शाळेत गावातील ६० ते ९० वयाच्या सर्व आजीबाईंनी सहभाग नोंदवत शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे सिद्ध केले. जगभरातून या शाळेचे कौतुक होत आहे. आजीबाईंची शाळा सुरू करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे बांगर यांनी नुकतीच त्यांच्या स्वत-च्या शेलारी गावात आजी-आजोबांच्या शाळेची सुरुवात केली. ही शाळा फक्त रविवारी भरत असून, या शाळेत नऊ लोक हे संसारातील जोडीदार असल्याने नुकताच शाळेत व्हॅलेंटाईन दिवसही साजरा झाला. या शाळेचे कौतुक होत असताना फांगणे गावची आजीबाईंची शाळा लिम्का बुकमध्ये जाणे हेही कौतुकास्पद असल्याने लिम्का बुकचे संपादक विशाल बनरेज यांनी सन्मानपत्र पाठवून शाळेला गौरविले आहे. योगेंद्र बांगर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, केवळ मुरबाड तालुका नव्हे तर देशभरात ही पहिलीच आजीबाईंची शाळा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT