मुंबई

कोरोना वाढलाय, नियम पाळा; सोसायट्यांना BMC चे कडक निर्बंध लागू

समीर सुर्वे

मुंबई : कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर महानगर पालिकेने "सप्टेंबर'फॉर्म्युला वापरण्यास सुरवात केली आहे. यानुसार आता प्रभाग कार्यालयांमार्फत संकुलांना स्मरणपत्र पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. इमारतीच्या आवारात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. यात विशेषता बाहेरगावावरुन, परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती तत्काळ पालिका प्रभागातील वॉर रुमला कळविण्याची सुचना करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात कोविड शिखरावर असताना महानगर पालिकेने यंत्रणा ज्या पध्दतीने राबवली त्याच पध्दतीने आता काम सुरु करण्यात आले आहे. कोविड काळात महानगर पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमार्फत सर्व निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक संकुलांना लेखी सुचना देण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर आताही सुचना देण्यात येत आहे."कार्यालयांनी 50 टक्के उपस्थीती ठेवावी असे आवाहन करण्यात आले'असल्याचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
प्रभाग कार्यालयांमार्फत निवासी संकुलांना लेखी स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. त्यात संकुलाच्या आवारात रहिवाशी मास्क वापरतील, सामाजिक अंतर राखतील याची खबरदारी घेण्याची सुचना करण्यात आली आहे. त्याच बरोबर बाहेरगावरुन, परदेशातून आलेल्या प्रवाशंची माहिती प्रभागाच्या वॉर रुमला कळविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. "पालिकेच्या एस प्रभागा मार्फत विक्रोळी,कांजूरमार्ग भांडूप परीसरातील संकुलांना'अशा नोटीस पाठविण्यास सुरवात झाली आहे.

हे लक्षात ठेवा
- इमारतीच्या प्रवेशव्दारावर सॅनिटायझर ठेवावा
-इमारतीच्या आवारात कोणताही सामाजिक कार्यक्रम घेणे टाळावे
-इमारतीत आणि आवारात मास्क वापरावे,सामाजिक अंतर राखावे

बाहेरील व्यक्तींना बंदी
इमारतीत घरकामासाठी येणाऱ्यांचे दैनंदिन तापमान तपासणी आणि ऑक्‍सीजन पातळी तपासावी. तसेच, शक्‍य असल्यास काम करणाऱ्या कुटूंबातच राहाण्याची सोय करावी. अशी सुचना करण्यात आली आहे. त्याच बरोबर फेरीवाला,कुरीअर बॉय,लॉड्रीवाला,डिलीव्हरी बॉय यांना इमारतीत प्रवेश देऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.


गृहविलगीकरणात असणाऱ्यांवर लक्ष
कोविडची बाधा झाल्यानंतर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात राहाण्याची मुभा देण्यात येत आहे. अशा व्यक्तींवरही लक्ष ठेवावे.ती व्यक्ती घरा बाहेर पडत असल्यास अथवा सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यास तत्काळ प्रभागाच्या वॉर रुमला कळवावे असेही या स्मरणपत्रात नमुद करण्यात आले आहे.

----------------------------------

marathi news Follow the corona grown rules Strict restrictions of BMC apply to societies live update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या; बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

Solapur Politics: सुधीर खरटमल राष्ट्रवादीत; ज्येष्ठ नेते बळीराम साठेंचा लवकरच प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच सोलापूर दौऱ्यावर

Magician Shamsundar: इंस्टाग्रामचा लाडका जादूगार शामसुंदर काका ‘अदृश्य’… ८४व्या वर्षी मागे ठेवून गेले हसू अन् जादूच्या आठवणी

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन गैरव्यवहार; सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित, चौकशीसाठी समिती नेमली

Stomach Health: समोसा किंवा पाणीपुरी नाही तर 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते गॅस आणि अपचन, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT