kalyan
kalyan 
मुंबई

कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये 'नो व्हेईकल डे' साजरा

रविंद्र खरात

कल्याण : वाहनांच्या धुरामुळे आणि कर्कश्श आवाजाने निश्चित नागरीकांना त्रास होतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यासाठी नो व्हेईकल डे संकल्पना राबविण्यात आली त्याला आज चांगला प्रतिसाद मिळाला असून आता वर्षातून दोन वेळा हा दिवस साजरा करण्यात येणार असून हा उपक्रम एका कॉलेज पुरता न राहता सर्व संस्थांना एकत्र आणू अशी माहिती बिर्ला कॉलेज प्राचार्य डॉ नरेशचंद्र यांनी सकाळला दिली. 

कल्याण पश्चिम मधील प्रसिद्ध बिर्ला कॉलेज मध्ये सुमारे 9 हजार 500 बिद्यार्थी शिकत असून 300 कर्मचारी आणि शिक्षक वर्ग आहेत. ठाणे जिल्ह्यातुन अनेक विद्यार्थी येतात. प्रतिदिन अंदाजे कॉलेज परिसरात 1442 दुचाकी तर 189 कार प्रतिदिन पार्क केले जातात. वाहनाचा धूर, हॉर्नचा कर्कश आवाज, यामुळे परिसरातील नागरीक आणि कॉलेज मधील विद्यार्थी, शिक्षकांना होत आहे. कॉलेज प्रमाणे शहरात ही वाहनांची संख्या वाढत असून पर्यावरण ही दूषित होत आहे त्यामुळे एक दिवस स्वतःच्या वाहनाने प्रवास न करतात खासगी रिक्षा, केडीएमटी बस आणि सायकलने प्रवास करत कॉलेज मध्ये येण्याची संकल्पना समोर आली त्याला नाव ठेवण्यात आले नो व्हेईकल डे. आज मंगळवारी (ता. 20) नो व्हेईकल डे जाहीर केल्यानुसार सकाळच्या सत्रात बिर्ला कॉलेज मधील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी वर्गाने सायकल, रिक्षा, केडीएमटी बसने प्रवास करत कॉलेज गाठले.

कॉलेज परिसरामधील पार्किंग झोनमध्ये एकही वाहन नसल्याने सर्वांनी एक सुटकेचा श्वास सोडला. प्रतिदिन राबवा असे काही नागरिक सूचना देत होते. कॉलेज परिसरमधील हिरवळ आणि झाडांची सावली यामुळे सुटलेला गार हवा ही रोजच मिळण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे. दरम्यान नो व्हेईकल डे ला चांगला प्रतिसाद पाहता हा उपक्रम केवळ कॉलेज मध्ये न राबविता शहरात ही साजरा केला पाहिजे त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बिर्ला कॉलेज पुढाकार घेईल अशी माहिती यावेळी बिर्ला कॉलेज प्राचार्य डॉ नरेशचंद्र यांनी सकाळला दिली तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक नितीन बर्वे, किशोर देसाई आणि सुरक्षा विभागाने अथक मेहनत घेतली.

विशेष केडीएमटी बस...
नो व्हेईकल डे साजरा करताना विद्यार्थी वर्गाला त्रास होऊ नये यामुळे केडीएमटीने सकाळी 6 वाजल्यापासून विशेष बसेस सोडल्या होत्या. सकाळच्या सत्रात केडीएमटी सभापती संजय पावशे,  सदस्य राजेंद्र दिक्षित, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव आदींनी कॉलेजला भेट देत सभापती पावशे आणि सदस्यांनी कॉलेज मधील विद्यार्थ्यांना फुले देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी बिर्ला कॉलेजचे प्राध्यापक नितीन बर्वे, किशोर देसाई आणि सुरक्षा अधिकारी वर्ग ही उपस्थित होते. 

वाहतूक पोलिसांची कारवाई...
कॉलेज प्रशासनाने नो व्हेईकल जाहीर केले असताना काही बेशिस्त विद्यार्थ्यांनी वाहन आणल्याने त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली यावेळी अनेकांनी हेल्मेट घातले नव्हते तर अनेकांकडे लायसन्स नव्हते. 

हेल्मेट शिवाय कॉलेजमध्ये प्रवेश नाही..
सुरक्षित आणि सुखकर प्रवास करण्यासाठी स्वतःने पुढाकार घेतला पाहिजे या धर्तीवर दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट घालणे गरजेचे आहे यासाठी हेल्मेट घातल्याशिवाय कॉलेजच्या आवारात दुचाकी पार्क करता येणार नाही यासाठी कॉलेज प्रशासन विचार करत असल्याची माहिती प्राध्यापक नितीन बर्वे यांनी दिली.

शाळा कॉलेज ने पुढाकार घेतल्यास त्यांच्या सोबत - सभापती संजय पावशे 
शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना केडीएमटी बस मधून सवलत दरात पास मिळत असून विविध उपक्रमाला केडीएमटी बस आम्ही निश्चित देऊ, त्यासोबत लवकरच शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास देणार असून आजच्या नो व्हेईकल दिवशी कल्याण रिंगरूट विशेष बस सोडण्यात आल्या त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सभापती संजय पावशे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT