Representational Image 
मुंबई

मुंबई, ठाण्यातील भारनियमन मागे; उर्वरित राज्यातील 'अंधार' कायम!

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महावितरणच्या अ आणि ब ग्राहक श्रेणीतील भारनियमन आज टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात आले. त्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील वीज ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. पण उर्वरीत क ते जी 3 या ग्राहक श्रेणीतील ग्राहकांसाठी मात्र भारनियमनाचे चटके आणखी काही दिवस सहन करावे लागणार आहे.

आज दिवसभरात राज्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण असले तरीही विजेच्या भारनियमनात आज विशेष काही फरक पडला नाही. शहरी आणि ग्रामीण भागात आजही महावितरणने 2000 मेगावॉट विजेच्या तुटवड्यासाठी भारनियमन केले. 

दिवसभरात राज्यातील अनेक भागात काही तासांचे भारनियमन करण्यात आले. राज्याची आजची विजेची मागणी 17800 मेगावॉट होती, तर 15800 मेगावॉट वीज महावितरणला उपलब्ध झाली. राज्यातील भारनियमन कमी करण्यासाठी अधिक दराने वीज खरेदी करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगानेही परवानगी दिली आहे. महावितरणचा 700 मेगावॉट वीज खरेदीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

महावितरणला युनिटमागे आता 5.50 रूपयांपर्यंत वीज खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये 500 मेगावॉट वीज राऊंड द क्‍लॉक पद्धतीने तर 200 मेगावॉट वीज दिवसापोटी खरेदी करण्याचा महावितरणचा निर्णय आहे. आज महानिर्मितीमार्फतही 4800 मेगावॉट वीज पुरवण्यात आली. तर कोयना विद्युत प्रकल्पातून 1400 मेगावॉट वीज आपत्कालीन स्थितीत राज्याला उपलब्ध झाली.

महावितरणने नोव्हेंबरपर्यंत 700 मेगावॉट वीज याआधीच अल्प मुदतीच्या खरेदी करारावर विकत घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emotional Raksha Bandhan: जी बहीण आता या जगात नाही, तिच्या हातांनी भावाला राखी बांधली!

Indian Railway: भारतीय रेल्वेकडून जपानमध्ये १० दिवसांची सफर, कधीपासून होणार सुरू? पहा बुकिंग प्रकिया आणि किंमत

Student End Life Kolhapur : नववीच्या मुलीला असलं काय टेन्शन आलं, राहत्या घरात घेतला गळफास अन्...

ZIM vs NZ 2nd Test: न्यूझीलंडच्या ९५ वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच असे घडले! १९८६ मध्ये भारतीयांनी केला होता असा पराक्रम...

Shiv Sena : महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा असेल, उदय सामंताचे कोल्हापुरात कोणाला आव्हान

SCROLL FOR NEXT