DombivaliDombivali
DombivaliDombivali 
मुंबई

डोंबिवलीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची जयंती उत्साहात साजरी

संजीत वायंगणकर

डोंबिवली : बारा जानेवारी हा योगायोगाने प्रखर हिंदुत्ववादी दिवस आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोगलांच्या जुल्मी सत्तेच्या अराजकतेच्या काळात आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्वार्थाने सर्व क्षेत्रात पारंगत करुन शिवारायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंचा व इंग्रजांच्या जुल्मी राजवटीत संपूर्ण जगाला हिंदू धर्माचे महत्त्व पटवून देणारे व सशक्त बलवान तरुण पिढीचा आग्रह धरणारे स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तीमत्वांचा जन्मदिवस.

अशा दिवशी शिक्षण व कला क्षेत्रात संस्कारक्षम पिढी घडवून त्यांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा देणाऱ्या शिक्षिकांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देताना मला आनंद होत आहे असे उद्गार राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले.

विदर्भ मराठवाडा रहिवासी सेवा संस्थेद्वारे प्रती वर्षीप्रमाणे डोंबिवली पूर्वेकडे इंदिरा चौकात राजमाता जिजाऊ जयंती सोहळा व प्रथमच जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष दत्ता मळेकर व सहकारी यांनी आयोजन केले होते. ओंकार शाळेच्या संस्थापिका दर्शना सामंत, चंद्रशेखर साने विद्यामंदिरच्या संस्थापिका अश्विनी साने, शिक्षिका व श्रीकला संस्कार संस्थेद्वारे कलाकार घडविण्याचे अविरत कार्य करणाऱ्या दिपाली काळे, भविष्यातील गरज ओळखून अद्ययावत संगणक व वेब शिक्षण देणाऱ्या उमा गणपुले व नृत्य क्षेत्रात विद्यार्थी तयार करणाऱ्या वैशाली दुधे या पाच शिक्षिकांचा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते यंदा प्रथमच राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, भाजपचे पूर्वमंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर, कामगार नेते नंदू परब, आर. पी. आयचे उपाध्यक्ष माणिक उघडे, सभापती खुश्बू चौधरी, नगरसेवक मुकुंद पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT