मुंबई

पीएमसी बँकेत घोटाळा नव्हे लूटच! HDILच्या अधिकाऱ्यांच्या खात्यात 2 हजार कोटी ट्रान्सफर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  डबघाईला आलेल्या एचडीआयएल या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांच्या खात्यात पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 2 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे ही रक्कम एचडीआयएलसाठी कर्ज म्हणून मंजूर झाली होती. नियमानुसार ही रक्कम बँकेच्या खात्यात जायला हवी होती. मात्र, ती गेली अधिकाऱ्यांच्या खात्यात. पीएमसी गैरव्यवहाराप्रकरणी आणखी काही चुरस आणि चमत्कारिक गोष्टी समोर येतायत.

  • एचडीआयएलच्या मदतीसाठी पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 44 गुप्त खाती बनवली होती.
  • ही खाती गौपनीय पद्धतीनं चालवली जात होती. 
  • रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही खाती दाखवली गेली नव्हती.
  • ही खाती ती पासवर्ड प्रोटेक्टेड होती

एचडीआयएलला जी रक्कम कर्जाऊ म्हणून दिली होती ती सर्व एनपीएमध्ये बदलण्यात आली..एचडीआयएलकडे अडकलेल्या कर्जांची माहिती दडवल्याचं बँकेचे निलंबित एमडी जॉय थॉमस यांनी दडवल्याचं कबूल केलंय.

इतकंच काय तर एचडीआयएलला दिलेल्या कर्जाची रक्कम 6 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते. बँकेच्या एकंदर मालमत्तेच्या 8 हजार 800 कोटी रुपयांच्या 73 टक्के इतकी ही रक्कम आहे. मंजूर केलेल्या मर्यादेच्या हे 4 पट अधिक कर्ज आहे.

आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केलीय..त्या आधी कर्जबुडवेगिरी करणाऱ्या एचडीआयएलचे प्रवर्तक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केलीय..मात्र, हा सर्व प्रकार एचडीआयएलच्या घशात सामान्य गुंतवणूकदारांची रक्कम ओतण्यासाठी केला असावा, असंच हा प्रकार पाहिल्यानंतर लक्षात येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Route Update : शक्तिपीठ महामार्गाबाबत अफवांना उधाण, मार्ग कुठून जाणार राजपत्र कधी होणार प्रसिद्ध...

घरात प्रचार करू नका म्हणल्यानं संतापले, शिंदेंच्या कार्यकर्त्यांची दोघांना मारहाण; ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेनमध्ये बॉम्बच्या धमकीने प्रवाशांमध्ये गोंधळ

एका क्षणात संसार उद्ध्वस्त! साक्री–शिर्डी महामार्गावरील भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच अंत; दोन चिमुकली झाली पोरकी

BMC Election: सात महापौर-उपमहापौर निवडणूक रिंगणात, विरोधकांचे कडवे आव्हान; राजकीय प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT