Thane
Thane 
मुंबई

ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर नवा उन्नत मार्ग!

श्रीकांत सावंत

ठाणे : ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या घोडबंदर रोडवरील आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणारी वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी या मार्गावर उन्नत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या महामार्गाविषयीचे काम केले जाणार असून हा प्रकल्प संकल्पन-वित्त पुरवठा-बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (डीएफबीओटी) तत्वावर बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूरबावडी ते गायमुख मार्गावर हा रस्ता होणार असून या रस्त्यासाठी 667.37 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून डिसेंबर 2002 साली हे काम पुर्ण झाले होते. परंतु या महामार्गावरील गायमुखच्या दिशेकडील रस्त्याचे चार पदरीकरण करण्यात आले असून हा परिसर नेहमीच वाहतुक कोंडीच्या गर्तेत सापत असतो. नवी मुंबईकडून होणाऱ्या अवजड वाहने आणि कंटनेर रस्त्यात बंद पडल्यास अथवा अपघात घडल्यास या महामार्गावर पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना अनेक तास या मार्गावर अडकून पडावे लागत होते. वाहतुक कोंडीचे हे प्रमाण वाढत असताना या रस्त्याच्या आणखी रुंदीकरणाची गरज व्यक्त केली जात होते. परंतु दुतर्फा झालेले प्रचंड नागरिकरण आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग या रस्त्याच्या लगत असल्यामुळे रस्त्याची रुंदीकरण अधिक वाढवणे अशक्य झाले होते. त्यामुळे या भागामध्ये उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता. त्या संदर्भामध्ये शुक्रवारी निर्णय घेण्यात आला असून या भागामध्ये 4.4 किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संकल्प-वित्तपुरवाठ-बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या संदर्भातील कार्यवाही करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या प्रखल्पाच्या बांधकामासाटी 667.37 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जलद प्रवास...
ठाणे शहरातून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग घोडबंदर पट्ट्यामध्ये चारपदरी असल्यामुळे या भागामध्ये वाहनांना मोठ्या कोंडीला सामोर जावे लागत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्यामुळे या भागामध्ये जमीन अधिग्रहण करून रस्ता रुंदीकरण करणेही शक्य नव्हते. त्यामुळे या भागामध्ये उन्नत मार्ग उभारण्याच्या प्रस्तावाची गेली वर्षभरापासून चाचपणी सुरू होती. अखेर त्याला मुहूर्तस्वरूप प्राप्त झाले आहे. घोडबंदर रोडवर शहरामध्ये उड्डाणपुल अस्तित्वात असले तरी गायमुखच्या पट्ट्यामध्ये पुल नसल्यामुळे पर्यायी वाहतुक उपलब्ध होत नव्हती. नव्या उन्नत मार्गामुळे या भागातील वाहतुक सुरळीत होऊन नवा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT