Subhash Desai sakal media
मुंबई

मराठी भाषा भवनासाठी चार वास्तुविशारदांचे प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मरीन ड्राईव्ह (marine drive) येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन (marathi bhasha bahvan) प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. या वेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव सादर केले. या प्रकल्पासाठी शासनाने २५०० चौरस मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल; तर पुढील अठरा महिन्यात मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती या वेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी दिली.

मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी भाषा भवन मुख्य केंद्र’ बांधण्यात येत आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून याअंतर्गतच आज चार वास्तुविशारदांनी सादरीकरण केले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईही उपस्थित होते. वास्तुविशारदांच्या सादरीकरणात प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले होते. या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहच्या मागे आणि शासकीय प्रेसशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर हे भवन उभे राहणार आहे.

झोपडीधारकांना नोटिसा

भाषा भवन ज्या जागेवर उभे राहणार आहे, तेथे सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या असून त्या हटवल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज या झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरणाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT