पालघर : झाडावरच असलेली नागवेलीची पाने.  
मुंबई

नागवेली पानांना उत्तरेतील राज्यांत बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने गेल्या २५ दिवसांपासून हा उत्पादित झालेला सर्व भाजीपाला व नागवेलीची पाने सध्या झाडांवरच आहेत; मात्र या मालाच्या वाहतुकीसाठी पालघर जिल्हा कृषी विभागाने परवानगी दिल्याने येथील नागवेलीच्या पानांसह मिरची आणि भाजीपाल्याला उत्तरेकडील राज्यांची बाजारपेठ मिळणार आहे. 

पालघर तालुक्‍यातील मिर्ची, भाजीपाल्यासह केळवे-माहीमच्या नागवेलीच्या पानांच्या व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. सध्या पालघर जिल्ह्यात उत्पादित सर्व नाशवंत मालाला वाहतूक सुरू करून देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पालघर जिल्हा कृषी विभागाने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हा माल पालघर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने उत्तरेकडील राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार आहे.

हा शेतमाल पाठवण्यासाठी रेल्वे गाड्यांची सुविधा पालघर रेल्वे स्थानकातून होणार असल्याने या भागातील पाने, मिरची, चिकू व इतर उत्पादने उत्तरेकडील भागांमध्ये कमी दरात आणि जलद गतीने पाठविणे शक्‍य होणार आहे. पश्‍चिम रेल्वेने सुरू केलेल्या विशेष मालवाहू सेवेसाठी पालघर येथे गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे.

केळवेतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली; मात्र लॉकडाऊनमुळे माल पडून असल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.
जयेश पाटील, अध्यक्ष, शेतकी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT