मुंबई

ममताची हत्या की, आत्महत्या? वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ

दोन महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न.

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा:- चार दिवसांपासून बेपत्ता (missing) असलेल्या विवाहित महिलेचा मृतदहे अखेर रविवारी सायंकाळी वसईच्या (vasai seaface) किल्लाबंदर समुद्र किनाऱ्यावर आढळला. ममता पटेल (mamta patel) (30) असे मृत विवाहितेचं नाव आहे. बुधवार पासून ती बेपत्ता होती. समुद्र किनाऱ्यावर ममताचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की, आत्महत्या (suicide) हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून , पोलीस याचा तपास करीत आहेत. (married women Mamta patel dead body found at vasai seaface)

ममता वसईच्या एव्हरशाईन परिसरातील रहायला होती. तिचे गुजरातमधील नावसारी हे मूळ गाव आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात ममता पटेलचा विवाह झाला होता. बुधवार सकाळी सहा वाजता वसई एव्हरशाईन परिसरात ती मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यानंतर ती घरी परातलीच नाही. नातेवाईकांनी पूर्ण परिसरात शोध घेतला. पण ती सापडली नाही.

नालासोपारा पूर्व तुलिंज पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली होती. चार दिवसानंतर बेपत्ता महिलेचा वसई किल्लाबंदर समुद्र किनाऱ्यावर मृतदेह मिळाल्याने एकाच खळबळ उडाली आहे. एव्हरशाईन ते वसई किल्लाबंदर हे अंतर 15 ते 20 किलोमीटरचे आहे. दोन महिन्यापूर्वीच विवाह झालेली महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती.

ममता किल्लाबंदर परिसरात कशी गेली?, तिला कुठले अमिष दाखवून तिकडे नेऊन तिची हत्या केली की ती स्वत: जाऊन आत्महत्या केली? याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन साठी पाठविला आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून विविहितेची हत्या की, आत्महत्या याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Shortage Explained: भारतात पेट्रोल-डिझेल टंचाई येणार का? की ही फक्त अफवा? खरं काय?

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Shivaji Maharaj Statue : मोहोळनंतर आता मोडनिंबमध्येही 'गनिमी कावा'! पहाटे 4 वाजता असं काय झालं की गावाची झोपच उडाली? 'तो' नजारा पाहून सगळेच अवाक्

Rahul Gandhi : अमेरिका, इराण युद्धावर राहुल गांधींनी मौन सोडलं, थेट पतंप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका

Who Is Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण? मध्यरात्री अचानक मोठे फेरबदल

SCROLL FOR NEXT