मुंबई

हा फोटो इटली किंवा अमेरिकेतील नाही; हे आहे मुंबईतील NSCI डोम क्वारंटाईन सेंटर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपायला काही दिवस उरलेत. मात्र महाराष्ट्र आणि मुख्यत्त्वे मुंबई पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. मुंबईत दररोज शेकडो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतायत. या परिस्थितीत मुंबई पुण्यातील लॉकडाऊन आता वाढवला जाणार असल्याचं बोललं जातंय.

स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडल्यास मास्क लावूनच बाहेर पडा असं देखील सांगितलंय. एकंदर परिस्थिती चिंताजनक आहे. अशात मुंबईतील आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात म्हणजेच वरळी भागात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या उपाय योजना करण्यास सुरवात झालीये.        

भविष्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढला तर काय ? म्हणून आता युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जातायत. वरळीमधील NSCI डोमला क्वारंटाईनसाठी तयार करण्यात आलंय. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना क्वारंटाईन करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या डोममध्ये तब्ब्ल ५०० बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. याचसोबत ४३ खोल्या हा आयसोलेशनसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. मुंबईतील कोरोना बाधितांचा वाढता आलेख पाहता ही उपपययोजना अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. 

मुंबईत लवकरच कोरोना रॅपिड टेस्टिंग

सरकारकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातायत.  कोरोनाचा वाढत आकडा कमी करण्यासाठी मुंबई महापालिकाने देखील कंबर कसली आहे. केंद्र सरकारने मुंबईत कोरोना रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरात-लवकर मुंबईत कोरोना रॅपिड टेस्टिंग सुरु होणार आहे. यासाठी लागणारे किट्स मुंबई महापालिका साऊथ कोरियामधून मागवणार आहे. 1 लाख  अशा प्रकारचे किट्स महापालिका विकत घेणार आहे. हे किट्स मुंबईत आल्यानंतर मुंबईत रॅपिड टेस्टिंग सुरू होणार आहे. यामार्फत अवघ्या काही मिनिटात कोरोनाची लागण झालीये की नाही झाली हे समजू शकणार आहे.

massive dome turned into quarantine center at mumbai aaditya thackeray shares photo

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT