मुंबई

मास्टरप्लॅन! कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई झोपडपट्टीत पालिकेचा नवा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातच कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा मुंबईत आहे. देशाचा कोरोनाबाधितांची संख्या पाहिल्यावर लक्षात येतं की, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यानंतर राज्यातला आकडा पाहिल्यावर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यातही झोपडपट्टी भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून झोपडपट्टी भागातील कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं एक निर्णय घेतला आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी आणि लोकांचा एकमेकांसोबत किमान संपर्क येण्यासाठी बीएमसीने वांद्रे आणि सांताक्रूझमधील झोपडपट्टयांमध्ये सार्वजनिक शौचालयात पायानं हाताळणारी सॅनिटायझर डिस्पेंसिंग मशीन बसवण्यात आली आहे. 

प्राणघातक व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर हे एक चांगले साधन आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर कंटेनरला हाताळणं नेहमीच चिंतादायक असते. या मशीनचं पायानं पेडल दाबल्यास सॅनिटायझर हातावर घेता येते. त्यामुळे त्वचेशी थेट संपर्क कमी येतो आणि अशाप्रकारे कोविड- 19चा प्रसार रोखण्यात मदत होते. 

आम्ही 54 मशीन्स बसवण्याचे नियोजन आखले आहे. त्यापैकी 40 मशीन आधीच बेरमपाडा, ए.के. मार्ग, वांद्रे स्थानक, गोळीबार रोड, दीपक वाडी-खार, गोळीबार कब्रस्तान या भागात बसवण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. 

सामान्य आणि सार्वजनिक शौचालयांमध्ये कोविड -19 पसरण्याचा धोका जास्त असल्याचं अधिकाऱ्यानं नमूद केलं. दिवसातून किमान तीन वेळा महानगरपालिकेने कामगारांना स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी तैनात केले आहेत. तरी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्यानं मशीन बसवण्यात आल्या असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

कोविड 19च्या विरुद्ध सुरु असलेल्या लढाईसाठी हे एक चांगलं साधन आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी असं पाऊल पडणं जास्त गरजेचं असल्याचं स्थानिक नगरसेवक सदानंद परब यांनी म्हटलं आहे. 

लोकांना थेट संपर्क टाळणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयांसमोर हे मशीन स्थापित करीत आहोत. हे रहिवाशांसाठी उपयुक्त ठरेल, असं एच पूर्व प्रभागचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT