मुंबई

केंद्र सरकारचं महाराष्ट्र, मुंबईवर प्रेम; कोविन अॅपवरुन महापौरांची टीका

पूजा विचारे

मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकंवर काढलेलं दिसत आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क घालण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतल्या कोरोनाच्या सद्यस्थितीवर आणि कोविन अॅपवर भाष्य केलं आहे. 

किशोरी पेडणेकर यांनी कोविन अॅपचं विकेंद्रीकरण करण्याची मागणी केली आहे. तसंच कोविन अॅपची सगळी सूत्र केंद्राच्याच हातात असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोविन अॅप पाच- पाच दिवस बंद राहत आहे. लसीकरणाच्या सगळ्या सुविधा असूनही आम्हाला केवळ कोविन अॅपमुळे लस देता येत नसल्याचंही खंतही महापौर यांनी व्यक्त केली आहे. 

केंद्राचं महाराष्ट्र, मुंबईवर प्रेम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविन अॅपचं विकेंद्रीकरण करावं. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासोबतच लसीकरण वाढवणंही महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांना मी आणि स्थायी समिती अध्यक्ष भेटून ही बाब मार्गी लावण्यासाठी विनंती करणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं आहे. 

सगळ्या मंगल कार्यलयाच्या प्रमुखांनी निवेदन दिलं आहे. हॉलच्या ५० टक्के क्षमतेने लोकांना प्रवेशाची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

हॉलमध्ये किमान २५ ते ३० कुटुंब अवलंबून असतात. हातावरची पोट असणारी लोक काही आहेत. त्यामुळे ते सवलत मागत आहेत. पण निर्णय राज्य शासनाचा आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना हे सांगणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी १० दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे. ते  पाळाव लागणार आहे. रुग्ण संख्या वाढली नाही तर सवलतीचा विचार होऊ शकतो, असं महापौर म्हणाल्या आहेत.

Mayor Kishori Pednekar criticizes central government from Covin app

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT