Kishori Pednekar  Team eSakal
मुंबई

"हात जोडते पण मास्क लावा"; महापौर पेडणेकर ग्राऊंडवर

पर्यटकांची रेलचेल असणाऱ्या गेट वे ऑफ इंडियाच्या परिसराची पाहणी केली.

सुधीर काकडे

राज्यात कोरोना रुग्णांची (Covid19) संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यातच आता ओमिक्रॉनचंही (Omicron) आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. याच पार्श्वभूमिवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. त्यांनी लोकांना मास्क घाला अशी विनंती देखील केली. राज्यात निर्बंध लावल्यानंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित केले गेले. त्यावर देखील महापौर पेडणेकरांनी उत्तर दिलं.

एकीकडे मुंबईमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना अनेक सार्वजनिक ठिकाणी मुंबईकर मात्र गर्दी करताना दिसून येतात . अशातच गेटवे परिसरात जाऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः आढावा घेतला आहे त्याच प्रमाणे पोलिसांनाही काही सूचना किशोरी पेडणेकर यांनी केल्या आहेतत जोडून विनंती केली. तसंच गर्दी टाळा असंही आवाहन केलं.

राज्यात निर्बंध लावल्यानंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित केले गेले. त्यावर देखील महापौर पेडणेकरांनी उत्तर दिलं. तुम्ही बाहेरच्या पायरीवर बसून नारेबाजी करता. पायरीवर येऊन तुम्हाला विश्वासात घ्यायचं का? केंद्राची टीम, तज्ज्ञांची टीम ही मुख्यमंत्र्यांच्या घरातली नाही. ती तज्ज्ञ टीम सांगते त्यावर चर्चा होते त्यानंतर नियम लावले जातात. मुख्यमंत्री त्याला मान्यता देतात, मी बसणार पायरीवर आणि सभागृह आत चालणार, मग बोलणार विश्वासात घेतलं नाही. तुम्ही पायरीवर बसू नका आत बसा आणि चर्चा करा असं म्हणत पेडणेकरांनी विरोधकांचा समाचार घेतला.

"कोरोना विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो." असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT