MBBS|OBC Student| Mumbai High Court Esakal
मुंबई

MBBS: खोटी माहिती देत 'एमबीबीएस'ला प्रवेश, तरीही हायकोर्टाने फेटाळली पदवी रद्द करण्याची याचिका; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Mumbai High Court: या विद्यार्थीनीच्या पालकांनी तिला अयोग्य मार्गाने ओबीसी कोट्यातून प्रवेश मिळवून दिल्यामुळे दुसऱ्या पात्र उमेदवाराला वंचित रहावे लागले आहे.

आशुतोष मसगौंडे

एका विद्यार्थीनीने 2012 मध्ये खोटी माहिती देऊन नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र मिळवून ओबीसी कोट्यातून मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. त्यामुळे तिची पदवी रद्द करावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने देशात डॉक्टरांची गरज असल्याचे सांगत तिची पदवी रद्द करण्याची मागणी फेटाळली.

यावेळी न्यायमूर्ती ए एस चांदूरकर आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने सांगितले की, या विद्यार्थीनीच्या पालकांनी तिला अयोग्य मार्गाने ओबीसी कोट्यातून प्रवेश मिळवून दिल्यामुळे दुसऱ्या पात्र उमेदवाराला वंचित रहावे लागले आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या विद्यार्थीनीचा प्रवेश कायम ठेवताना, विद्यार्थिनीला अतिरिक्त 50,000 रुपये भरून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी म्हणून फी भरण्याचे निर्देश दिले.

मुजावर यांना देण्यात आलेले नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र रद्द करताना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय्य असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाने फेब्रुवारी २०१४ मध्ये तिचा एमबीबीएस अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द केला होता.

मात्र, अंतरिम आदेशाद्वारे तिला महाविद्यालयात शिकण्याची परवानगी देण्यात आली होती. ताज्या निकालात, उच्च न्यायालयाने सांगितले की, तिने 2017 मध्ये तिचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केल्यामुळे, तिला पदवी प्रदान केली जावी.

आधीच डॉक्टर म्हणून पात्र झालेल्या विद्यार्थ्याला पदवी न देणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. खोटी माहिती देण्याच्या आणि विद्यार्थ्याची आई महापालिकेत काम करते हे उघड न करण्याच्या वडिलांच्या निर्णयालाही यावेळी उच्च न्यायालयाने फटकारले.

2012 च्या सुनावणीदरम्यान मुजावर यांनी असा युक्तिवाद केला की, तिच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला असल्याने, त्यांनी प्रमाणपत्रावर तिच्या उत्पन्नाचा उल्लेख केला नाही.

दुसरीकडे, सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, विद्यार्थिनीच्या वडिलांनी खोटे सांगितले की, नॉन-क्रिमी स्टेटससाठी 4.5 लाख उत्पन्न मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये म्हणून ते एकत्र राहत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार?; ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; पक्ष एकसंध असल्याचा राऊतांचा दावा

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

SCROLL FOR NEXT