प्रवासासाठी वैद्यकिय प्रमाणपत्र हवंय? ...या ठिकाणी मिळणार 
मुंबई

प्रवासासाठी वैद्यकिय प्रमाणपत्र हवंय? ...या ठिकाणी मिळणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक असलेले वैद्यकिय प्रमाणपत्र महापालिकेच्या रुग्णालयात तसेच दवाखान्यामध्ये मिळणार आहे. स्थालांतरीत कामगारां बरोबर महाराष्ट्रात अडकलेले इतर राज्यातील भाविक तसेच विद्यार्थांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

इन्फ्लएंझा म्हणजे फ्ल्यू सदृश्य लक्षण नसणार्यांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे. टाळेबंदीमुळे अडकलेले भाविक, विद्यार्थी आणि कामगारांना त्यांच्या मुळ राज्यात जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, हा प्रवास करताना त्यांना वैद्यकिय प्रमाणपत्रासह पोलिस ठाण्यात अर्ज करायचा आहे. हे प्रमाणपत्र कोणाकडून घ्यावे याबाबत संभ्रम होता. महापालिका प्रशासनाने आज परिपत्रक काढून पालिका रुग्णालये तसेच दवाखान्यांमधून हे प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच नोंदणीकृत खासगी डॉक्टरही हे प्रमाणपत्र देऊ शकतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

चार प्रमुख रुग्णालये, 16 उपनगरीय रुग्णालये आणि 174 दवाखान्यांमधून हे प्रमाणपत्र मिळणार आहे. दवाखान्यांमध्ये 2 ते 4 या वेळेत प्रमाणपत्र मिळेल त्याच बरोबर संबंधित व्यक्तीने त्यांच्या सरकारी ओळखपत्र असल व नक्कल प्रत (फोटो कॉपी) सोबत ठेवावी असे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT