मुंबई

आज राज्यभरातील वैद्यकीय सेवा बंद ! सीसीआयएमच्या अधिसूचनेला आयएमएचा विरोध

भाग्यश्री भुवड

मुंबई : सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केली असून या अधिसूचनेला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. या विराेधात आज (शुक्रवारी) राज्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील साधारण सव्वा लाख डाॅक्टर सहभागी हाेणार आहेत. शुक्रवारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरु राहणार आहेत. मात्र इतर प्रा‌‌‌थमिक सेवा बंद राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसीएशनकडून सांगण्यात आले.

राज्यव्यापी वैद्यकीय बंदमध्ये इंडियन मेडिकल असाेसीएशनचे ४५ हजार डाॅक्टर, मार्ड, निवासी, सर्जन असे राज्यभरातील एकूण सव्वा लाख डाॅक्टर या बंदमध्ये सहभागी हाेणार आहेत. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत आराेग्य सेवा बंद असणार आहे. यात दवाखाने, ओपीडी, क्लिनिक अशा प्रा‌‌थमिक सेवा बंद राहतील, तर अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत, या बंदमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची काेणतीही गैरसाेय हाेणार नसल्याचे इंडियन मेडीकल असाेिसएशनचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भाेंडवे यांनी सांगितले. 

का आहे विरोध ? 

या अधिसूचनेत सीसीआयएमने 58 शस्त्रक्रियांना शल्यतंत्र आणि शालाक्य तंत्र सांगून पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट केली आहेत. जनरल सर्जरी, युरॉलॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, (पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया) इ.एन.टी. (नाक-कान-घसा), ऑफ्थाल्मोलॉजी (नेत्ररोग शस्त्रक्रिया) आणि डेंटिस्ट्री (दंतरोग शास्त्रक्रिया) यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील १५० सरकारी आणि खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या डॉक्टरांची ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्कही आंदोलन करणार आहे.

याशिवाय या आंदोलनास महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स म्हणजे मध्यवर्ती मार्ड संघटनेने ही पाठिंबा दिला आहे. आयएमए सदस्य 8 डिसेंबरपासून निदर्शने करत असून 11 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर वैद्यकीय सेवा बंद करण्यात येणार आहे. कोविड सेवा वगळता बंद राहतील. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसूतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया या सेवा सुरु राहणार आहे.

केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास राष्ट्रीय आयएमए सर्वोच्च न्यायालयात, राज्य आयएमए शाखा उच्च न्यायालयात, तर स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमधील खटले दाखल करतील असा इशाराही देण्यात आला आहे.

medical services to remain close as IMA opposes CCIAM notification

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT