मुंबई

महामुंबईत रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

कुलदीप घायवट

मुंबई  : मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील  सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी 10.50 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. 

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रेल्वे मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी  4.05 वाजेपर्यंत दुरुस्ती केली जाणार आहे. परिणामी पनवेल ते वाशी, बेलापूर / नेरुळ ते खारकोपर वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या साेयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लाेकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी वाहतूक सुरु राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रविवारी सांताक्रुझ ते गाेरेगाव दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच दोन्ही दिशेकडील मार्गावरील काही लाेकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Megablock on Central Western and Harbor railway lines in Mumbai on Sunday

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT