Mega block mumbai  Sakal
मुंबई

Mumbai Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Mega Block : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.२२) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरूळ अप-डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे :

कुठे : ठाणे-कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर

कधी : मध्य रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर वळवल्या जातील; तर मुंबईतून जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : मानखुर्द ते नेरूळ अप-डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करिता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : गोरेगांव ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकलसेवा गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT