मुंबई

चित्रपटात काम देण्याचे अमिष दाखवून लैंगिक शोषण! उपायुक्ताविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी: वस्तू व सेवा कर विभागातील उपायुक्तांविरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी पीडित महिलेला चक्क मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ अधिकारी यांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर तक्रार घेत गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीत वस्तू व सेवा कर विभागात उपायुक्त असलेले अरूण चोधरी यांनी आपले लग्न झालेले असुनही स्वतःला घटस्फोटीत असल्याचे सांगून आपल्यासोबत एक वर्ष प्रेमसंबंध ठेवले, आणि त्यानंतर अचानक प्रेमसंबंध तोडल्याचा आरोप केला आहे. फिर्यादी महिला स्ट्रगलर अभिनेत्री असल्याने या अधिकाऱ्याने आपल्याला चित्रपटात काम देण्याचेही कबूल केले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान ओशिवरा पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे पीडितेने मुख्यमंत्री व इतर अधिकारी यांना संपर्क केल्यानंतर अखेर त्यांच्या आदेशानुसार त्या महिलेची तक्रार घेत ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

जीसटी अधिकारी अरुण चोधरी यांच्यावर रजिस्टर क्रमांक 296/20 कलम 276 (2) 377, 323, 506 आयपीसी कलम अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
– धनंजय बांगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ओशिवरा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT