metro 7 
मुंबई

लॉकडाऊन : मेट्रो-7 मार्गिकेचे काम प्रगतीपथावर, परंतु...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या मेट्रो-7 या मार्गिकेची कामे प्रगतीपथावर सुरु असून गुरुवारी रात्री प्रस्तावित पोईसर स्थानकासाठी एक सरकता जिना दाखल करण्यात आला.

लॉकडाऊननंतर मेट्रोच्या सर्व प्रकल्पांच्या कामांवर अंशतः बंदी ठेवण्यात आली. तसेच अनेक परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावाकडे निघून गेल्याने पुढील वर्षाच्या सुरुवातीस कार्यान्वित होणारे मेट्रो 7 व 2 बी प्रकल्प नियोजित वेळेत सुरू होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.  मेट्रो-7 मार्गिकेवर डिसेंबर 2020 पर्यंत मेट्रो धावेल, असे एमएमआरडीएने जाहीर केले होते. मात्र कंत्राटदारावर कारवाई आणि गत दीड महिन्यापासून लागू असलेला लॉकडाऊन या कारणांमुळे  ही  मार्गिका वेळेत कार्यान्वित होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मार्गिकेवरील 5.9 किमी मार्गासाठी मे. एमबीझेड-आरसीसी या कंपनीला 521.21 कोटी रुपयांचे कंत्राट एप्रिल 2018 मध्ये देण्यात आले होते. एकूण कामापैकी 60 टक्के काम 30 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, 21 महिन्यांनतरही केवळ 4.48 टक्केच काम पूर्ण झाले, तर डेपोच्या बांधकामासाठी एमबीझेड-आरसीसी कंपनीस 390.44 कोटी रुपयांचे कंत्राट जानेवारी, 2018 मध्ये देण्यात आले होते. त्यानंतरच्या 36 महिन्यांत 50 टक्के काम अपेक्षित होते. मात्र, केवळ 6.98 टक्केच काम 25 महिन्यांत पूर्ण झाले. यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे मेट्रोची कामे रखडली
कंपनीवरील कारवाई व लॉकडाऊनमुळे मेट्रो-2 बी, मेट्रो-7 मार्गिकेची कामे रखडली. मात्र आता मेट्रो प्रशासनाने कंत्राटी कामगारांकडून रात्रंदिवस कामे करवून घेतली आहे.  या उर्वरित कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामे पुन्हा सुरू केले जाईल. यामुळे या मार्गिकेचे काम रखडणार नसल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Metro-7 corridor work in progress, read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT