मुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर ! येत्या सोमवारपासून मेट्रो 1 च्या वेळापत्रकात बदल

कुलदीप घायवट

मुंबई : वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 1 च्या वेळापत्रकात येत्या सोमवारपासून बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो 1 च्या मार्गावरून वर्सोवा आणि घाटकोपरवरून रात्री 1 तास अधिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे. वर्सोवावरून शेवटची मेट्रो रात्री 9.50 वाजता घाटकोपरसाठी सुटेल. तर, घाटकोपर वरून वर्सोवासाठी शेवटची मेट्रो रात्री 10.15 वाजता सुटेल.

मार्च अखेरीपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मेट्रोच्या फेऱ्या बंद होत्या. त्यानंतर सात महिन्यांनी ऑक्टोबर महिन्यात मेट्रोची सेवा सुरू झाली.  सध्या मेट्रो मार्गाचे काही प्रवेशद्वार बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. मात्र येत्या सोमवारपासून आणखीन प्रवेशद्वार खुले करून प्रवाशांना ये जा करण्यासाठी मार्ग मोकळा होईल. त्यामुळे गर्दीचा लोंढा विभाजित होण्यास मदत होईल. साकीनाका, मरोळ नाका, चकाला आणि पुर्व द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानकातील येथील आणखीन प्रवेशद्वार खुले केले जाणार आहेत.

  • वर्सोवावरून पहिली मेट्रो सकाळी 7.50 वाजता, तर घाटकोपर येथून सकाळी 8.15 वाजता मेट्रो धावेल. 
  • वर्सोवावरून शेवटची मेट्रो रात्री 9.50 वाजता, तर घाटकोपरवरून  शेवटची मेट्रो रात्री 10.15 वाजता सुटेल.
  • पहिल्या मेट्रोच्या सुटण्याच्या 15 मिनिटांआधी स्थानके खुली होतील.

मेट्रोच्या फेऱ्या वाढणार 

मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. साधारण 70 हजारांच्या आसपास हा आकडा पोहचला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होण्यासाठी फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सध्या मेट्रोच्या 200 फेऱ्या होत आहेत. दोन्ही दिशेकडील शेवटच्या फेरीत एक तास वाढविल्याने फेऱ्या देखील वाढणार आहेत. 18 तारखेपासून 230 फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे. 

metro one to increase frequency of trains from 18th january 2021
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT