Crime
Crime 
मुंबई

अंधेरी मेट्रो स्थानकात बॉम्बची अफवा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - अंधेरी मेट्रो स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी योगेंद्रप्रसाद रामेश्‍वर चौरसिया आणि शबीनाथ बसावंत विश्‍वकर्मा यांना अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता. १५) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अंधेरीतील चांदिवली परिसरात राहणारे चौरसिया आणि विश्‍वकर्मा गुरुवारी (ता. ८) सकाळी अंधेरी मेट्रो स्थानकात आले होते. वर्सोव्याहून घाटकोपरला जाणारी मेट्रो सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंधेरी स्थानकात येण्यापूर्वी अचानक धावपळ सुरू झाली. त्या वेळी या दोघांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे काही काळ मेट्रो स्थानकात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सुरक्षा रक्षकांनी मेट्रोची पाहणी केली; मात्र काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. 

बॉम्बची अफवा पसरवून मेट्रो थांबवून ठेवल्याबद्दल या दोघांना सुरक्षा रक्षकांनी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले. बम’ हा शब्द ऐकून आपण पळत असताना सुरक्षा रक्षकांनी पकडले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी अंधेरी पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT