Mumbai Sakal
मुंबई

मुंबई : डिसेंबर-जानेवारीत मेट्रोची चाचणी

डिसेंबर-जानेवारीमध्ये मेट्रो-३ च्या चाचण्या होण्यास सुरुवात होईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात मेट्रो ट्रेनच्या चाचणीकरिता व ट्रेन पार्क करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कुलाबा-वांद्रे सीप्झ मेट्रो-३ भुयारी मार्गावरील पहिली आठ डब्यांची ट्रेन या वर्षअखेरीस मुंबईत दाखल होणार आहे. हे आठ डबे स्वतंत्रपणे मुंबईत आणले जातील व त्यांचे एकत्रीकरण केले जाईल. या प्रक्रियेला किमान दोन आठवडे लागतील आणि त्यानंतर पहिल्या ट्रेनच्या चाचणीस सुरुवात होईल. त्यामुळे डिसेंबर-जानेवारीमध्ये मेट्रो-३ च्या चाचण्या होण्यास सुरुवात होईल.

मेट्रो-३ बावत आतापर्यंत खूप राजकारण झाले असून चाचणी कधी होणार, असे प्रश्न मुंबईकरांना पडले आहेत. सरकारने चाचणीकरिता व ट्रेन पार्क करण्यासाठी सुविधा निर्माण केल्याने मेट्रो-३ ची चाचण्या भुयारी भागास आणि भूपृष्ठभागावर जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पच्या मुखाशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

Pune Expansion: पुणे महापालिकेला २३ गावांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द

SCROLL FOR NEXT