online exam sakal
मुंबई

म्हाडा भरती परीक्षा : वेळापत्रकात पुन्हा बदल, 'या' कालावधीत परीक्षा

तेजस वाघमारे

मुंबई : म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेचा पेपर (Mhada exam) फोडण्याचा कट उघड झाल्याने म्हाडाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली होती. यानंतर म्हाडाने फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र आता या तारखांमध्येही म्हाडाने बदल (Exam date changed) करून ही परीक्षा 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर (timetable announcement) केले आहे. (Mhada online exam new timetable announced)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीमार्फत ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचे समोर येताच म्हाडाने 12 ते 20 डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेली परीक्षा ऐनवेळी रद्द केली. यानंतर म्हाडाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी टीसीएस या कंपनीची निवड केली आहे. कंपनीची निवड केली तेव्हा म्हाडाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र या कंपनीमार्फत विविध भरती परीक्षांची कामे सुरु असल्याने म्हाडाने या परीक्षा 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 29 आणि 30 जानेवारी रोजी सहायक वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक- टंकलेखक या पदांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सहा सत्रात घेण्यात येणार आहे. तर 31 जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता या पदांची परीक्षा तीन सत्रात घेण्यात येईल,.तसेच 31 जानेवारी रोजी सहायक विधी सल्लागार पदाची परीक्षा एका सत्रात घेण्यात येणार आहे.

१ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा 3 सत्रात घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात येईल, 3 फेब्रुवारी रोजी मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा एका सत्रात होईल, त्यांप्रमाणे 3 फेब्रुवारी रोजी कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक पदाची परीक्षा एक सत्रात होईल. या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT