Mhada sakal media
मुंबई

म्हाडाच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ९ ऑक्टोबरला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांसाठी (Apartment) अर्ज मागविण्यात आले आहेत. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर (website) प्रसिद्ध केली जाणार आहे. स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती दाखल करणे, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची (lottery final list) प्रसिद्धी याबाबतच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (Mhada website) ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे.

प्रारूप यादीची प्रसिद्धी झाल्यापासून दावे-हरकती ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली. संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईत निवडणूक आणि नववर्ष जल्लोषाची धामधूम; पोलिसांसमोर बंदोबस्ताचे आव्हान

प्राजक्ता माळी बिग बॉसमध्ये जाणार? चाहत्यांच्या प्रश्नावर स्पष्टच बोलली, लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Best Shares to Buy: एका वर्षात मालामाल करू शकतात हे शेअर्स! तज्ज्ञांची फेव्हरेट लिस्ट समोर; जाणून घ्या डिटेल्स

Pune News: ..अखेर बिबट मादी जेरबंद; चार दिवस पिंजऱ्याला हुलकावणी, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी साेडला सुटकेचा श्वास!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठका सुरू

SCROLL FOR NEXT