मुंबई

Mhada Lottery: अखेर म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीसाठी मुहूर्त ठरला

पूजा विचारे

मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीसाठी दिवाळीचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. म्हाडा आता लॉटरीतील 2500 घरांऐवजी 4000 च्यावर घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

गोरेगावमधील 3400 तर विखुरलेल्या 600 घरांचा लॉटरीत समावेश असणार आहे. गोरेगाव पहाडी येथे 7500 घरे बांधण्यात येत आहेत. यातील 2500 घरे येत्या काही वर्षांत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे ही घरे लॉटरीत समाविष्ट करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे.  आता यापुढे जात गोरेगावातीलच आणखी 900 घरे लॉटरीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचवेळी विखुरलेली 600 घरे मिळाली असून ही घरे ही लॉटरीत समाविष्ट करत एकूण 4000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी जून 2019 मध्ये मुंबईतील घरांसाठी लॉटरी निघाली होती. त्यानंतर 2020 मध्ये लॉटरी निघाली नाही. दोन वर्षांनी मुंबईत लॉटरी निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 2007 पासून 2019 पर्यंत केवळ एक वर्षे वगळता सलग मुंबईतील घरांसाठी लॉटरी निघाली आहे. या आधी डिसेंबरमध्ये लॉटरीची गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली होती.

 MHADA will draw 4 thousand houses instead of 2 thousand 500 lottery Jitendra Awhad 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT