एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक!
एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक! 
मुंबई

एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या परीक्षा होणार असून त्या 12 दिवस चालणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही परीक्षा आता जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सीईटी परीक्षेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. विविध सत्रांत ही परीक्षा 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30 आणि 31 जुलैला होणार आहे. त्याचबरोबर या तारखांना विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही तर ही परीक्षा 3 ते 5 ऑगस्टला पुन्हा होणार आहे. सीईटीसाठी एकूण 5 लाख 24 हजार 907 विद्यार्थ्यांनी राज्य तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

या परीक्षेला "सोशल डिस्टन्सिंग'चे नियम काटेकोर पाळण्यात येतील. त्यासंदर्भातील तयारी सीईटी सेलकडून सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी क्‍लास लावले किंवा नोंदणी केली आहे आणि लॉकडाऊनमुळे आपल्या घरी अन्य जिल्ह्यात असतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत जाता येत नसेल तर त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था विभागामार्फत करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. वैद्यकीय पदव्युत्तर आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रक्रियादेखील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू करण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT