mumbai sakal
मुंबई

डोंबिवलीतील एम.आय.डी.सी. परिसर कचरामुक्त होणार

डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात सर्वत्र कचरा पसरलेला असतो. मात्र आता कंपन्यांतील कचरा व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी संस्था नेमणे, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यां विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमणे याबरोबरच आठवडी बाजार बंद करणे याविषयीची बैठक झाली असून हा परिसर लवकरच कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने काम केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सूचना पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना दिली होती. त्याअनुषंगाने गुरुवारी कामा संघटनेच्या कार्यालयात एक बैठक पार पडली. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, एम.आय.डी.सी.चे उप अभियंता पतंगे, महापालिका घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार, नरेंद्र धोत्रे, अनिकेत धोत्रे आदी उपस्थित होते.

एमआयडिसी क्षेत्रात पडणारा डोमेस्टिक वेस्ट, कंपन्यातील ड्राय वेस्ट यासोबत झाडांचा पालापाचोळा यांची विल्हेवाट लावण्यासाठी खाजगी संस्था नेमणे व रस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांविरूध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याकरीता संयुक्तिक भरारी पथक नेमणे व कचरा निर्माण करणारे आठवडे बाजार बंद करणे इत्यादी बाबींवर महत्वपूर्ण चर्चा घडून आली. एमआयडीसी भागातील इंडस्ट्री मधील प्लास्टिक, कागद इ. सुका कचरा महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत उचलण्यात येईल, जेणेकरून महापालिकेवरील ताण कमी होईल. दर 15 दिवसांनी संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असाही निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता हा परिसर कचरा मुक्त होईल असा विश्वास यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT