एमआयडीसी ची पाईपलाईन फुटली  sakal
मुंबई

डोंबिवली : एमआयडीसी ची पाईपलाईन दोन ठिकाणी फुटली

पाईपलाईन शनिवारी सकाळी दोन ठिकाणी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील एमआयडिसीची 1800 मिमी व्यासाची पाईपलाईन शनिवारी सकाळी दोन ठिकाणी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देसाई गाव व खिडकाळेश्वर मंदिर जवळ ही लाईन फुटली. एमआयडीसी अधिकारी घटनास्थळी पोहोचत असून या लाईनचा पाणी पुरवठा बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे.

ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, एमआयडिसी औद्योगिक विभागास पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास फुटली.

यामुळे रस्त्यावर पाण्याचे मोठे फवारे उडत होते. सकाळी चाकरमान्यांची कामावर जाण्याची वेळ असल्याने त्यात कल्याण शीळ रोडवर पाईपलाईन फुटून त्याचे पाणी आल्याने वाहतूक काहीशी मंदावली होती.

ही पाईपलाईन जुनी झाली असल्याने ती वारंवार फुटणे, लिकेज होणे अशा घटना घडत असतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देसाई गाव व खिडकाळेश्वर मंदिर जवळ अधिकारी पोहोचत असून या लाईनचा पाणी पुरवठा आता बंद करण्यात आला आहे. पाणी कमी होताच पाईपलाईन दुरुस्ती चे काम हाती घेण्यात येईल असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT