एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने शिळफाट्यावर लाखो लिटर पाणी रस्त्यावर 
मुंबई

एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने शिळफाटा येथे लाखो लिटर पाणी रस्त्यावर

राहूल क्षीरसागर

ठाणे : मुंब्रा देसाई गाव, शिळफाटा बदलापूर रोड येथे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी शुक्रवारी रात्रीच्यावेळी फुटली. ही जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच, एमआयडीसीकडून तात्काळ शटडाऊन करण्यात आले. मात्र, या दरम्यान, लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी विभागाकडून देण्यात आली. 

मुंब्रा देसाई गावनजीक शिळफाटा बदलापूर रोडवर ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनीजवळ स्फोटासारखा मोठा आवाज होऊन जलवाहिनी फुटली. पाण्याचा दाब जास्त असल्याने उंच पाण्याचे फवारे उडत होते. अवघ्या 15 मिनिटांत कल्याण- शिळ फाटा रस्त्यावर पाणीच पाणी साचले. दोन किलोमीटर रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते. पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले होते. 

देसाई गावातील ग्रामस्थांनी पालिका आणि पोलिसांना पाईपलाईन फुटल्याची माहिती दिल्यानंतर एमआयडीसीचे अधिकारी दोन तासांनी घटनास्थळी आले. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शनिवारी काटई नाका ते भाईंदरपर्यंत काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात आला; तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. शनिवारी सायंकाळपर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी विभागाकडून देण्यात आली.
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC PLAYER OF THE TOURNAMENT LIST: वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत भारताचा 'एकटा टायगर'! ICC ने जाहीर केली ८ नावं... जाणून घ्या कोण?

Sakal Sanman 2026 : ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत सर्वांची स्वप्ने पूर्ण होतील! ‘सकाळ सन्मान’मध्ये मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास

Iran Warship Attack: इराणच्या दुसऱ्या जहाजाची मदतीसाठी साद; श्रीलंकेकडे प्रवेशासाठी मागितली परवानगी, वाटाघाटी सुरू

MP Dr. Kalyan Kale : युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेले जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे मायदेशी परतले

Sangli Shivaneri Bus : सांगली-पुणे मार्गावर धावणार शिवनेरी; राज्यात २०० व्होल्व्हो बस; ‘एसटी’चा ताफा मुंबई-पुणेबाहेर घेणार धाव

SCROLL FOR NEXT